कृषिदिनी पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:54+5:302021-07-07T04:23:54+5:30

राज्यस्तरीय पीक स्पर्धेमध्ये तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये अमरावती विभागस्तरामधून विजय इंगळे, चितलवाडी यांनी हरभरा पिकामध्ये ...

Agriculture Day crop competition winners honored | कृषिदिनी पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

कृषिदिनी पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

राज्यस्तरीय पीक स्पर्धेमध्ये तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये अमरावती विभागस्तरामधून विजय इंगळे, चितलवाडी यांनी हरभरा पिकामध्ये हेक्‍टरी ५२ क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम, तर अनंता दही यांनी हेक्टरी ५१ क्विंटल उत्पादन घेऊन अमरावती विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

हरभरा पिकामध्ये हेक्‍टरी ४२ क्विंटल उत्पादन घेऊन रायखेड येथील अमोल नेमाडे यांनी प्रथम, तर हेक्‍टरी ४० क्विंटल उत्पादनासह हिंगणे बुद्रुक येथील प्रगतिशील युवा शेतकरी सचिन गजानन कोरडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन कृषी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे मुंडे व तालुका कृषी अधिकारी एम.डी. वानखेडे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाला मंडल कृषी अधिकारी गौरव राऊत, उमेश कदम, नरेंद्र राठोड व एम. व्ही. पाटकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आत्माराम नेमाडे यांनी केले.

फोटो:

Web Title: Agriculture Day crop competition winners honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.