कृषी विद्यापीठाचे जलस्रोत पडले कोरडे!
By Admin | Updated: May 11, 2014 18:14 IST2014-05-11T18:03:27+5:302014-05-11T18:14:33+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला आहे.

कृषी विद्यापीठाचे जलस्रोत पडले कोरडे!
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला आहे. सध्या विहिरींच्या पाण्यावर संशोधनाचे प्लॉट जगविले जात आहेत. विहिरींची पातळी खोल गेल्याने संशोधन जगविण्यासाठी पाणी आणणार कुठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे.
या कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकरच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक जमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्र आहेत. पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्या शास्त्रज्ञांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी - बियाणे संशोधन करू न शेतकर्यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञाच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, कंेद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे भविष्यात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळत होते. या पाण्यावर कृषी विद्यापीठाच्या शरद सरोवरात मुबलक पाणी असायचे, हे सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमणी आहे. या तलावातून ग्रॅव्हिटीने पाणी संशोधन प्रकल्पापर्यंत सोडले जायचे, पण अलीकडच्या काही वर्षात कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. यावर्षी अकोल्यातील मध्यवर्ती संशोधन प्रकल्पाच्या क्षेत्रावर जेमतेम संशोधनाचे प्लॉट आहेत. तेलबिया संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर बोअरवेलच्या पाण्यावर भुईमूग संशोधनाचे प्लॉट जगविले जात आहेत.
दरम्यान, कृषी विद्यापीठाला कायमचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम बीजोत्पादन, बियाणे उत्पादनावर होत आहे. आता ज्या काही क्षेत्रावर पेरणी केली आहे. या मे महिन्यात तगेल की नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरू पी पाणी मिळवून देण्याचे आव्हान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यासमोर आहे.