कृषी विद्यापीठाचे ‘सेंद्रिय शेती मिशन’
By Admin | Updated: April 15, 2015 00:16 IST2015-04-15T00:16:31+5:302015-04-15T00:16:31+5:30
गावागावांत कार्यशाळा; विदर्भात शेतक-यांना प्रशिक्षण.

कृषी विद्यापीठाचे ‘सेंद्रिय शेती मिशन’
अकोला : राज्य शासनाचा कृषी विभाग तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे राज्यात विषमुक्त सेंद्रिय शेती वाढावी, याकरिता मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विदर्भात एप्रिल व मे महिन्यात कार्यशाळा घेऊन शेतकर्यांना सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अधिक कृषी उत्पादनाच्या हव्यासापोटी राज्यात रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यासोबतच विषारी तणनाशकांचाही वापर वाढला आहे. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता घसरली आहे. परिणामी लोक आजारांना बळी पडत आहेत. मानवाची प्रतिकारशक्तीही विषयुक्त अन्नामुळेच कमी होत चालल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कार्यशाळेत कोणत्या बियाण्यांची केव्हा पेरणी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे डॉ. व्ही. एम. भाले यांनी सांगितले.