कृषी विद्यापीठात साडेपाचशे औषध वनस्पती

By Admin | Updated: August 6, 2014 01:00 IST2014-08-06T01:00:25+5:302014-08-06T01:00:25+5:30

खंडसिंग या दुर्मीळ वनस्पतीपासून ते डासांना पळवून लावण्यासाठी सिट्रोनेला गुणधर्म असलेल्या सुगंधी गवताचा समावेश आहे.

Agricultural University has five-fifths of pharmaceutical plants | कृषी विद्यापीठात साडेपाचशे औषध वनस्पती

कृषी विद्यापीठात साडेपाचशे औषध वनस्पती

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी उद्यानात सर्पदंशावर उपचार करणार्‍या खंडसिंग या दुर्मीळ वनस्पतीपासून ते डासांना पळवून लावण्यासाठी सिट्रोनेला गुणधर्म असलेल्या सुगंधी गवताचा समावेश आहे. पारंपरिक पिकांसोबतच औषधी वनस्पतींची लावगड करणे उपयुक्त असल्याने कृषी विद्यापीठाच्यावतीने विदर्भातील शेतकर्‍यांना त्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
विद्यापीठातील नागार्जुन उद्यानात साडेपाचशेपेक्षा जास्त सुगंधी औषधी वनस्पतींचे जतन करण्यात आले असूून, ३४0 औषधी वनस्पतींची एनबीपीजीआरकडे (नॅशनल ब्युरो ऑफ जेनेटिक प्लँट रिसोर्स) अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. या औषधी वनस्पतीचा व्यावसायिक उपयोग करायचा असेल, तर कृषी विद्यापीठांशी करार केल्यानंतरच त्याची अनुमती दिली जाणार आहे. यात सिम्बोपोगम या सुगंधी गवतवर्गीयामध्ये तिखाडी, गवती चहा व जावा सिट्रोनेलाचा समावेश आहे. सिट्रोनेला गवतामध्ये डासांना पळवून लावण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच काही खासगी कंपन्यांनी डासांपासून संरक्षण करण्यासाठी अंगाला लावणारे मलम या सुगंधी गवतापासून तयार केले आहे. सौंदर्य प्रसाधनांसाठीही या गवताचा सर्वाधिक वापर केला जात असून, आंघोळीचे साबण, अंगाला लावायची पावडर, डिओड्रंट तसेच परफ्युममध्ये याच गवतवर्गीय वनस्पतीचा वापर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सुगंधी औषधीला मोठी मागणी असून, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या सुगंधी वनस्पतीचा तिसरा क्रमांक आहे.
विदर्भातील शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीसोबतच या वनस्पती शेतीचा अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठ मार्गदर्शन करीत असून, त्यासाठी कमीत कमी एक टन क्षमतेचा प्रकल्प टाकण्याची गरज आहे. या प्रकल्पाला दररोज एक टन गवताची गरज असल्याने २५ हेक्टरवर या गवताची लागवड करावी लागते. या एक टन गवतापासून १0 किलो तेल मिळते. प्रती किलो ३६0 रुपये ही या तेलाची बाजारपेठेतील किंमत आहे. तेल काढल्यानंतर उरलेल्या गवताचा वापर सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो.

Web Title: Agricultural University has five-fifths of pharmaceutical plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.