शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र हलविले तारसा येथे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:04 AM

अकोला:  यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने  संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे अनेक संशोधनांचे केंद्र येथून हलवण्यात आले असून, कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र नागपूरनजीक असलेल्या तारसा येथे, तर कडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपास येथे हलविण्यात आले.  

ठळक मुद्देडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठकडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपासवरकायमस्वरू पी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याचा परिणाम

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने  संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे अनेक संशोधनांचे केंद्र येथून हलवण्यात आले असून, कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र नागपूरनजीक असलेल्या तारसा येथे, तर कडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपास येथे हलविण्यात आले.  कृषी विद्यापीठाकडे जवळपास ५ हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्रे आहेत; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्‍या शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाणे संशोधन करू न शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि, यावर्षी पाऊस नाही आणि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने हिवाळय़ातच रब्बी पिकांच्या पेरणीचा प्रश्न उपस्थित झाला. आताच ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्य़ात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. या कृषी विद्यापीठाने अनेक वाण विकसित करू न शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे; पण अलीकडच्या पाच-सात वर्षात पावसाची अनिश्‍चितता बघता संशोधन, बीजोत्पादनावर परिणाम होत आहेत.  रब्बी हंगामातील पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते; परंतु पाणी नसल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होत आहे. यावर्षीची परिस्थिती तर खूपच वेगळी आहे. पाणीच नसल्याने रब्बीचे उत्पादन घेणार कसे, यासाठीची कसरत सध्या विद्यापीठात सुरू  आहे. 

पूर्व विदर्भात साखर कारखाने!पूर्व विदर्भात साखर कारखाने असून, वातावरण अनुकूल असल्याने अकोल्याचे ऊस संशोधन केंद्र तारस्याला हलविण्यात आले. तारस्याला मनुष्यबळाची वानवा असून, तेथील मुख्यालयात राहण्यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कृषी विद्यापीठाला प्रथम ही व्यवस्था करावी लागणार आहे. वाशिम बायपास येथे पाण्याची बर्‍यापैकी मुबलकता असल्याने कडधान्य संशोधन केंद्र तेथे हलवले. या अगोदर नवेगाव बांध येथे ऊस संशोधन केंद्र होते. आजही ते रेकार्डवर आहे.

कृषी विद्यापीठात कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत नाही हे खरे आहे. उन्हाळ्य़ात परिस्थिती गंभीर होईल त्यासाठी विदर्भात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे येथील संशोधन केंद्र हलविले जात आहे. पूर्व विदर्भात साखर कारखाने आहेत. तेथे बारमाही पाणी उपलब्ध करावे लागेल.- डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर