कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त वाकी येथे शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:50+5:302021-07-10T04:13:50+5:30
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. विलास खर्चे आणि अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांचे ...

कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त वाकी येथे शेतीशाळा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. विलास खर्चे आणि अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कडू यांनी खारपाण पट्ट्यातील जमिनींच्या असणाऱ्या समस्या आणि सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना यावर उपस्थितांचे मार्गदर्शन केले. या संवाद कार्यक्रमामध्ये विभागातील डॉ. नितीन कोंडे, डॉ. भगवान सोनुने आणि डॉ. अशोक आगे यांनी हिरवळीच्या खतांचे जमीन सुपिकता मधील महत्व, भू-सुधारांकाचा शास्त्रीय उपयोग आणि रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. भगवान सोनुने यांनी आभार मानले. सूत्र संचालन डॉ. नितीन कोंडे यांनी केले.
शेतकऱ्यांना धैंचा हिरवळीच्या खताचे बियाणे वाटप
वाकी गावातीलच युवा शेतकरी रोशन गोरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी हा संवाद घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना धैंचा या हिरवळीच्या खताचे बियाणे वाटप करण्यात आले.