महाराष्ट्रातील कृषी साखळी प्रेरणादायी
By Admin | Updated: September 28, 2014 01:42 IST2014-09-28T01:42:10+5:302014-09-28T01:42:10+5:30
झारखंडच्या चमूकडून मुक्त कंठाने प्रशंसा

महाराष्ट्रातील कृषी साखळी प्रेरणादायी
अकोला : कृषी क्षेत्रात महाराष्ट्राने उत्तम प्रगती केली असून, या राज्यातील कृषी विभागाचे यामागे निरंतर प्रयास आहेत. कृषी विभागाची सुंदर साखळी येथे आहे. या राज्यातील कृषी क्षेत्राचे देशातील इतर राज्यांनी अनुकरण करण्याची गरज आहे. झारखंड राज्य सरकारने यासाठीच महाराष्ट्राच्या शेती, कृषी व्यवस्थेची झारखंडमध्ये अंमलबजावणी करण्याचे ठरविले असल्याची माहिती झारखंडच्या ग्रामीण उपजीविका विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अखिलेश सिंग, कमल जयस्वाल आणि स्वधीन पटनाईक यांनी खास ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
कृषी विभागाचे कामकाज व शेतकरी समूह बचत गटाचा अभ्यास करण्यासाठी झारखंड राज्य शासनाच्या ग्रामीण उपजीविका विकास संस्थेच्या या तीन अधिकार्यांचे शिष्टमंडळ अकोला जिल्हय़ाच्या दौर्यावर आले असताना त्यांनी खास ह्यलोकमतह्णशी बातचित केली.
प्रश्न- महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचाच अभ्यास का करावा वाटला?
इतर राज्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून, महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करू न शेतकर्यांना विपन्नावस्थेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. या राज्या तील कृषी विभागाची रचना शेतकर्यांसाठी सोपी आहे. शेतकर्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळावा म्हणून, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प एका बाजूला आहे, तर शेतकर्यांनी कोण ती पिके घ्यावी म्हणजे अधिक फायदा होईल, यासाठी तंत्रज्ञान देणारी ह्यआत्माह्ण दुसर्या बाजूला आहे. बियाण्याची सोय व्हावी, यासाठी बियाणे महामंडळ कार्यरत आहे. याशिवाय एकूणच परिस्थितीवर कृषी अधीक्षक कार्यालये नियंत्रण ठेवून असतात. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नवे संशोधन निर्माण करू न पीक उत्पादनात क्रांती कशी होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. एकूणच गाव पातळीपासून ते मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशी उत्तम साखळी या राज्यात आहे; नव्हे शेतकर्यांनी विकसित शेती करावी, यासाठीची त्यांची धडपड, हेच या राज्याच्या कृषी विकासाचे गमक असल्याचे दिसते. विशेष म्हणजे शेतीत चांगले उत्पादन व उल्लेखनीय काम करणार्या शेतकर्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्यामुळे शेतकर्यांना प्रेरणा मिळते.
प्रश्न- या दौर्यात आपण कोणता अभ्यास केला?
या दौर्यात आम्ही शेतकरी समूह बचत गटाचा प्रामुख्याने अभ्यास केला असून, येथील पीक पद्ध तीची माहितीही घेतली आहे. बचत गटाचे काम तर वाखाणण्यासारखेच आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेतकर्यांनी उत्पादक कंपन्या निर्माण केल्या असून, शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या मालाला त्यामुळे चांगले भाव मिळत आहेत. शेतकर्यांनी पीक पद्धतीत बदल करू न अनेक नवे प्रयोग केले आहेत.
प्रश्न- कोणते प्रयोग आवडले?
राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र सर्वाधिक उत्तम असून, देशात येथील फलोत्पादनाचा प्रथम क्रमांक आहे. दुसरीकडे बाजाराची गरज बघून उत्पादन घेण्याची येथील पद्धत वाखाणण्यासारखी आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे नियोजन करून साधलेला शेती विकास बघण्यासारखा आहे. शेतकर्यांनी सुरू केलेले प्रक्रिया उद्योग, दाल गिरणी व प्रतवारी, पॉलिश करणारे छोटे-छोटे उद्योगही स्तुत्य आहे त.
प्रश्न-झारखंड व महाराष्ट्रातील शेतीत काय फरक आहे?
कृषी क्षेत्राच्या बाबतीत झारंखड संक्रमणावस्थेत आहे. म्हणूनच कृषी क्षेत्रातील या प्रगत राज्याचा अभ्यास आम्ही करतोय. झारखंडमध्ये भात हे प्रमुख पीक असून, इतर भाजीपाला पिके आहेत. मिरची मोठय़ा प्रमाणावर घेतली जाते. चिंच, लाख आदी पिके घेतली जातात; परंतु यामध्ये कोणतीच सुसूत्रता नाही आणि उत्पादनही नाही. चिंचेवर प्रक्रिया होत नाही. यासाठी विदर्भातील सोयाबीन पीक झारखंडमध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही प्राधान्याने करणार असून, या राज्याचे कृषीशी संबंधित सर्वच उ पक्रम झारखंडमध्ये राबविण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यासाठी येथील पीक पद्धतीचा आम्ही अभ्यास करून ते झारखंडमध्ये घेण्याबाबत संशोधन करण्यात येईल.