शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

कृषी विद्यापीठात यावर्षी पाच दिवस चालणार कृषी प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 2:30 PM

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यात राज्यस्तरीय कृषी (अ‍ॅग्रोटेक-२०१८) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यात राज्यस्तरीय कृषी (अ‍ॅग्रोटेक-२०१८) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी तीन दिवसांऐवजी २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत पाच दिवस प्रदर्शन राहणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुरुवारी मुंबईला रवाना झाले आहेत.शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतीच्या दैनंदिन गरजा आणि शेतीच्या प्रश्नांची उकल होण्यासाठी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद व संस्थांच्या सहकार्याने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.नवनवीन संकल्पना आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे आता अनिवार्य असून, शेतकरीही हे तंत्रज्ञान अवगत करीत आहेत. किडींचा वाढलेला प्रादुर्भाव व शेतकºयांचा कीटकनाशकांवर होणारा खर्च टाळण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, गत दोन वर्षांपासून कापूस पिकांवर वाढलेली गुलाबी बोंडअळी बघता यावर्षी एकात्मिक कीड व्यवस्थापन व कमी खर्चात भरपूर उत्पादन देणारे तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनात शेतकºयांना बघता येणार आहे. शेतकºयांना व्यवसायाकडे वळण्यासाठी यावर्षी विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतकरी तसेच ज्या शेतकºयांनी विकसित केलेले प्रेरणादायी संशोधन, तंत्रज्ञानदेखील येथे असेल. यासोबतच शासनाच्या कृषी विभागाच्या योजना, उपक्रम, कृषी विद्यापीठाचे विविध संशोधन, तंत्रज्ञान, खासगी कंपन्यांचे दालन येथे असतील. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी, महिला बचत गटांची दालनेदेखील उपलब्ध असतील. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात यावर्षी तीन ऐवजी पाच दिवस प्रदर्शन चालणार असून, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अभ्यासासाठीदेखील पर्वणी ठरणार आहे.खेड्यातील शेतमालाची खेड्यातच प्रक्रिया होऊन गाव, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने विविध यंत्रे, कृषी अवजारे विकसित केली आहेत. ही यंत्रे येथे आकर्षण असतील. या कृषी विद्यापीठाने जातिवंत तसेच या भागातील पशुधनाचे ‘लाइव्ह शोकेस’ आहे. मोर्णा थडीच्या म्हशीपासून ते विदर्भातून नामशेष होत चाललेल्या गायींचे येथे संगोपन करण्यात आले आहे. परदेशी मुळाची थारपकर म्हशीसह गीर, लालकंधार गायी, उस्मानाबादी, बेरारी आदी जातींच्या शेळ्यादेखील येथे उपलब्ध असतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ