Agitation at Telhara Tehsil; Fury expressed by burning Shorghum | 'प्रहार'चे तेल्हारा तहसीलवर आंदोलन;  कणसाची बैलगाडी पेटवून व्यक्त केला रोष  

'प्रहार'चे तेल्हारा तहसीलवर आंदोलन;  कणसाची बैलगाडी पेटवून व्यक्त केला रोष  


तेल्हारा : विभागात परतीच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसानभरपाई व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती च्या वतीने दि. 18 नोव्हेंबर ला तहसीलला घेराव आंदोलन करून ज्वारी कणसाने भरलेली बैलगाडी पेटवून रोष व्यक्त केला.  जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन   देण्यात आले
        ओला दुष्काळ जाहीर करा ,  हेक्टरी २५ हजार मदत दया , वानधरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी आरक्षित करावे, सरस्कट कर्जमाफी करा , पिकविमा जाहीर करा, मागील वर्षीचा दुष्काळ निधी त्वरित दया,मुग, उडीद,पिकांचे पंचनामे  न होवू शकल्या मुळे त्यांचे नुकसान ग्राह्य धरून अनुदान तसेच पिकविमा दया,पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांचा खात्या मध्ये त्वरित जमा करा ,अतिक्रमण घरकुल लाभार्त्याना लाभ दया,शैक्षणिक शुल्क माफ करा अशा विषयावर प्रहार कडून दि. 18 नोव्हेंबर ला तहसील येथे घेराव आंदोलन करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व शेतकरी शेतमजूर यांच्या व्यथा कथन करून बैलगाडी मध्ये असलेल्या ज्वारी कणसाना पेटवून रोष व्यक्त केला यावेळी तालुक्यासह जिल्ह्य़ातील प्रहार चे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते तेल्हारा पोलिस ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बैलगाडी ची आग आटोक्यात आणली.

Web Title: Agitation at Telhara Tehsil; Fury expressed by burning Shorghum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.