पुन्हा काम बंद आंदोलनाचा इशारा!

By Admin | Updated: February 24, 2015 01:20 IST2015-02-24T01:20:18+5:302015-02-24T01:20:18+5:30

अकोला मनपा सफाई कर्मचा-यांनी दिले निवेदन.

Again the hint of stop movement! | पुन्हा काम बंद आंदोलनाचा इशारा!

पुन्हा काम बंद आंदोलनाचा इशारा!

अकोला: थकीत पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेवरून मनपा प्रशासन सफाई कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप करीत येत्या १ मार्चपासून काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा पुन्हा एकदा सफाई कर्मचार्‍यांनी आयुक्तांना दिला.
थकीत वेतनासह पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, नवृत्तीवेतन नियमित करणे, उपदानाची रक्कम तसेच अनुकंपा नियुक्तीच्या मुद्दय़ावर मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. प्रशासनाने तीन महिन्यांचे थकीत वेतन अदा केल्यानंतर उर्वरित मागण्यांवर आजपर्यंतही कारवाई झाली नाही. प्रशासनाने अशाप्रकारे कराराचा भंग केल्याचा आरोप करीत सफाई कर्मचार्‍यांनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन विजय सारवान,सचिन चावरे यांच्यासह सफाई कर्मचार्‍यांनी दिले.

*कर्मचारी संघर्ष समितीत फूट?
न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मनपाला प्राप्त झालेले तीन कोटी रुपये पाचव्या वेतन आयोगाच्या रकमेवर खर्च करता येतात किंवा नाही, याची खात्री केल्यानंतर आजपर्यंत ज्या कर्मचार्‍यांना पाचव्या वेतनाची रक्कम मिळाली, त्यानुसार उर्वरित रकमेचा टप्पा देण्याचे आश्‍वासन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बैठकीत संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले होते. यावर २८ फेब्रुवारीपासून होणारे संभाव्य आंदोलन १ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला होता. सफाई कर्मचार्‍यांनी मात्र पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने संघर्ष समितीत फूट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Again the hint of stop movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.