विजयादशमीनंतर प्रचाराचा धुराळा उडणार
By Admin | Updated: October 3, 2014 02:03 IST2014-10-03T02:03:39+5:302014-10-03T02:03:39+5:30
मतांचे गणितं जुळविण्यात अकोला जिल्ह्यातील उमेदवार व्यस्त.

विजयादशमीनंतर प्रचाराचा धुराळा उडणार
अकोला- जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. अपवाद वगळता पाचही म तदारसंघात पंचरंगी लढती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवार मतांचे गणितं जुळविण्यात व्यस्त झाले आहेत. घरोघरी जाऊन भेटी-गाठीचे सत्र सुरू असले तरी विजयादशमीनंतरच खर्या अ र्थाने प्र्रचाराचा धुराळा उडणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात ९३ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक २५ उमेदवार अकोला पूर्व तर सर्वात कमी १५ उमेदवार अकोला पश्चिम मतदारसंघात आहेत. आकोटमध्ये १८ आणि मूर्तिजापूरमध्ये १९ उमेदवार रिंगणात आहेत. बाळापूरमध्ये १६ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेसोबतच पाच मतदारसंघा तील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि भारिप-बमसं या पाच प्रमुख पक्षांमध्ये पंचरंगी लढती होणार, हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. याला एक- दोन मतदारसंघ अपवाद ठरू शकतात. सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी त्यांचा प्रचार गाठी-भेटीतून सुरू केला आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर गाठी-भेटी आणि बैठकांचा वेग वाढला आहे. एका-एका उमेदवाराने आतापर्यंत ५0 ते ६0 गावांमध्ये भेटी देऊन मतदारांना गळ घा तली आहे.
सर्वच उमेदवार प्रामुख्याने ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या घरी जाऊन भेटी देणे, तेथे परिचितांच्या बैठकी घेण्यावर भर देत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराचा धुराळा विजयादशमीनंतरच उडणार आहे. त्यासाठी सर्वच उमेदवारांनी तयारी केली आहे.