शिकवणी घेवून स्वबळावर ‘महेश’ झाला ‘डॉक्टरेट’!

By Admin | Updated: February 16, 2017 21:24 IST2017-02-15T20:00:16+5:302017-02-16T21:24:43+5:30

स्वत:ची परिस्थिती हलाखीची असतांना सुध्दा शिकवणी घेवून त्यामधून मिळणाºया पैशातून स्वत:चे उच्चशिक्षण पूर्ण केले.

After teaching, 'Mahesh' became 'doctorate' on self! | शिकवणी घेवून स्वबळावर ‘महेश’ झाला ‘डॉक्टरेट’!

शिकवणी घेवून स्वबळावर ‘महेश’ झाला ‘डॉक्टरेट’!

अनेक विद्यार्थ्यांची राहण्याची व शिक्षणाचीही स्वखर्चातून केली व्यवस्था
वाशिम : अतिशय हलाखीची परिस्थिती त्यातही शिक्षणाची आवड असलेल्या महेशने स्वबळावर पिएचडी करुन डॉक्टरेट होण्याचा बहुमान मिळविला. स्वत:ची परिस्थिती हलाखीची असतांना सुध्दा शिकवणी घेवून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून स्वत:चे उच्चशिक्षण पूर्ण केले. हे करीत असतांना वर्गातील अनेक गरिब व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देवून स्वखर्चातून त्यांची राहण्याची, खाण्याची व शिक्षण पूर्ण करण्याची व्यवस्था केली. आज त्यांनी मदतीचा हात दिलेले अनेक विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये, कॉलेजसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
मालेगाव तालुक्यातील छोटेसे गाव किन्हीराजा येथील महेश रामचंद्र तांदळे यांची जेमतेम परिस्थिती. अभ्यासात हुशार असल्याने मिळणाऱ्या शिष्यवृती व त्याला हातभार म्हणून विद्यार्थ्यांच्या शिकवणीतून त्यांनी आपले स्वताचे शिक्षण पूर्ण केले. स्वताची परिस्थिती पाहता असे अनेक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीतून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी यावेळी त्यांना आपल्या भाडयाच्या खोलीत राहण्यासाठी जागा, जेवणाच्या डब्याची व्यवस्था व वेळेप्रसंगी त्यांना लागणारे शालेय साहित्य पुरवून उच्चशिक्षीत केले. आज यातील काही विद्यार्थी अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर काही विविध कंपन्यांमध्ये उच्चपदावर नोकरी करीत आहेत. आजही त्यांच्या खोलीमध्ये अनेक विद्यार्थी मोफत राहून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. महेश तांदळे यांना नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्याकडून प्राणीशास्त्र विभागामध्ये ह्यप्लॅनकटॉन डिव्हरसिटी अ‍ॅन्ड युरिट्रॉफीकेशन स्टेटस आॅफ लोणार क्रिएटर इंडियाह्ण या विषयावर डॉक्टरेट मिळविली. त्यांना यासाठी राजस्थान कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. डी.एस. दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.


माझ्या शिक्षणासाठी मला करावे लागलेले ह्यस्ट्रगलह्ण पाहिले की तसे विद्यार्थी दिसल्याबरोबर मी त्यांना सहकार्य करतोय. आज त्यांचाच आर्शिवाद आहे हा जो मला ह्यडॉक्टरेटह्ण मिळाली.
- डॉ. महेश रामचंद्र तांदळे

Web Title: After teaching, 'Mahesh' became 'doctorate' on self!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.