विनयभंगानंतर मुलीचे विष प्राशन

By Admin | Updated: August 17, 2016 02:32 IST2016-08-17T02:32:58+5:302016-08-17T02:32:58+5:30

पीडितेची प्रकृती अत्यवस्थ: आरोपी युवकास अटक.

After the molestation, the girl's poison Prison | विनयभंगानंतर मुलीचे विष प्राशन

विनयभंगानंतर मुलीचे विष प्राशन

अकोला / खेट्री, दि. १६: चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरणगाव येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्यामुळे सदर मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. या मुलीवर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आरोपी युवकास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरणगाव-चरणगाव येथील रहिवासी एका १३ वर्षीय मुलीचा आरोपी सागर प्रल्हाद कडू (२१) याने विनयभंग केला. त्यानंतर सदर मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. अचानकच घडलेल्या या प्रकारामुळे मुलीला धक्का बसल्याने तिने राहत्या घरातच विष प्राशन केले. यामुळे मुलीची प्रकृती गंभीर झाली असून, तिला तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोकादायक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर कडू याच्याविरुद्ध ३५४, ४५२, ५0६ व पॉस्को अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी सागर फरार झाला. मात्र, चान्नी पोलिसांनी त्याला १६ ऑगस्ट रोजी अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १९ ऑगस्टपयर्ंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे करीत आहेत.

ठाणेदारांनीच मुलीचे नाव उघड केले
चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांनी पीडित मुलीचे नाव तिच्या वडिलांचे नाव जातीसह सोशल मीडियावर अपलोड केले. त्यामुळे वरणगाव येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, ठाणेदार पाटील यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पीडित मुलीचे, महिलेचे नाव सोशल मीडिया, वृत्तपत्रात प्रकाशित न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र त्यानंतरही ठाणेदार पाटील यांनी पीडित मुलीचे नाव एका व्हॉटस अँप ग्रुपवर टाकल्याने प्रचंड वादंग निर्माण झाले.

Web Title: After the molestation, the girl's poison Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.