हृदयविकाराच्या धक्क्यानंतरही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण
By Admin | Updated: September 24, 2015 01:40 IST2015-09-24T01:40:39+5:302015-09-24T01:40:39+5:30
बस बाजूला लावून घेतला अखेरचा श्वास.

हृदयविकाराच्या धक्क्यानंतरही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण
रिधोरा (जि. अकोला): स्वत: मृत्यूच्या दाढेत सापडला असतानाही प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला लावून चालकाने अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी व्याळाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. उत्तमराव गंगाधर रुम (रा. कौलखेड) हे मृत चालकाचे नाव आहे. अकोला आगाराची एमएच-४0-५३९९ क्रमांकाची बस अकोल्यावरून बुलडाणाकडे निघाली. बसमध्ये ३0 प्रवासी होते. बस व्याळाजवळ असताना चालक रुम यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांनी विचलित न होता संयमाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यांना पिण्यासाठी पाणीही देण्यात आले. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरुवारी अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.