भाजपच्या सभेनंतर परिसरात कच-याचा ढीग

By Admin | Updated: October 5, 2014 02:34 IST2014-10-05T02:18:48+5:302014-10-05T02:34:25+5:30

‘स्वच्छ भारत अभियान’ला ‘तिलांजली’

After the BJP meeting, | भाजपच्या सभेनंतर परिसरात कच-याचा ढीग

भाजपच्या सभेनंतर परिसरात कच-याचा ढीग

राम देशपांडे /अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सकाळी ह्यस्वच्छ भारत अभियानह्णची घोषणा केली. शुक्रवारी सायंकाळी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपचे देवेंद्र फडणवीस सभेला येणार्‍या कार्यकर्त्यांच्या चहापानाची व्यवस्था सभागृहाबाहेरील परिसरात करण्यात आली होती. मात्र सभा संपल्यानंतर परिसरात कार्यकर्त्यांनी चहापानानंतर फेकलेल्या प्लास्टिकच्या पेल्यांचा व इतर कचरा पडला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनाचह्यस्वच्छ भारत अभियानह्णचा विसर पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सभागृह परिसरात साचलेला कचरा दोन दिवस तसाच पडून होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरात दररोज विविध नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. दिवसागणिक प्रचारसभांचा जोर वाढणार आहे. गुरुवारी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात भाजपतर्फे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. सभेला येणार्‍या कार्यकर्त्यांसाठी सभागृहाबाहेरील परिसरात चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. चहापान केल्यानंतर प्लास्टिकचे पेले इतरत्र फेकून दिले गेले. आपल्याच पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या ह्यस्वच्छ भारत अभियानह्णचा विसर पडल्याचे दिसून आले. शुक्रवारपर्यंतही या ठिकाणी कचरा पडून होता.

Web Title: After the BJP meeting,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.