वकिलाचा पत्नीवर चाकुहल्ला

By Admin | Updated: October 14, 2015 01:16 IST2015-10-14T01:16:10+5:302015-10-14T01:16:10+5:30

उच्चशिक्षित वकिलाने कौटुंबिक वादातून पत्नीवर केला चाकुहल्ला; अकोला येथील घटना.

Advocate's wife Chakuhalla | वकिलाचा पत्नीवर चाकुहल्ला

वकिलाचा पत्नीवर चाकुहल्ला

अकोला: रविनगर येथील रहिवासी असलेल्या एका उच्चशिक्षित वकिलाने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकुहल्ला केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलीसांनी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविनगरमधील अँड. प्रमोद दांदळे यांचा त्यांच्या पत्नीशी सोमवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून प्रमोद दांदळे यांनी पत्नी स्वातीवर चाकुहल्ला चढविला. या चाकुहल्ल्यात स्वाती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अँड. प्रमोद दांदळे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Advocate's wife Chakuhalla