सुवर्णा नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी मदत - गडकरी
By Admin | Updated: April 5, 2016 01:49 IST2016-04-05T01:49:53+5:302016-04-05T01:49:53+5:30
शिर्ला प्रकल्पाची केली पाहणी करून गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

सुवर्णा नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी मदत - गडकरी
शिर्ला (जि. अकोला): पातूर तालुक्यातील १५ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची क्षमता असलेल्या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
वाशिम येथे एका कार्यक्रमाला जात असलेले केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. ह्यशिरपूर पॅटर्नह्णच्या बंधार्यातून निघणारी माती, मुरुम दर्जानुसार रस्ते बांधणीसाठी वापरला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रकल्पप्रमुख सचिन कोकाटे, संतोषकुमार गवई, मिशनप्रमुख अनिल जुमळे यांनी त्यांना प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. पातूर तालुक्यातील देऊळगाव, चिचखेड, बोडखा, पातूर, शिर्ला, भंडारज बु.,भंडारज खु., तांदळी बु., तांदळी खु., बेलुरा बु., बेलुरा खु., हिंगणा परिसरात 'शिरपूर पॅटर्न'च्या पद्धतीने लाभ होणार आहे, अशी माहिती त्यांना सांगण्यात आली.