मनपा शिक्षकांचे होणार समायोजन
By Admin | Updated: January 2, 2015 01:33 IST2015-01-02T01:33:55+5:302015-01-02T01:33:55+5:30
शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याला वेग.

मनपा शिक्षकांचे होणार समायोजन
अकोला: विद्यार्थ्यांची कमी होणारी पटसंख्या लक्षात घेता, कमी पटसंख्या असणार्या महापालिकेच्या ५५ पैकी २६ शाळांचे समायोजन नजिकच्या शाळेत करण्याचा निर्णय मनपाने घेतला. साहजिकच संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांचेसुद्धा समायोजन करावे लागणार असल्याने शिक्षकांच्या समायोजनाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे.
महापालिकेच्या मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या ५५ शाळेत ७ हजार ६३८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. २00६-0७ मध्ये मनपा शाळांमध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांंंंची पटसंख्या होती. मागील सात वर्षांंंंमध्ये विद्यार्थ्यांंंंच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. बहुतांश शाळेतील विद्यार्थी संख्या संच मान्यतेपेक्षा कमी असल्याने अशा शाळांचे नजिकच्या शाळेत समायोजन (एकत्रीकरण) करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांंंंचे समायोजन केल्यानंतर संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा समोर येईल. त्यानुषंगाने प्रशासनाने आतापासून संभाव्य अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांचा प्रस्ताव तयार करण्याला सुरुवात केली आहे. येत्या ३ जानेवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत मनपाच्या विविध मुद्यांवर चर्चा होणार असून, त्यामध्ये मनपा शाळेचा विषयदेखील मांडल्या जाणार आहे. शिक्षकांमध्ये अतिरिक्त कोण ठरते, या विचाराने शिक्षकांमध्ये घबराट पसरली आहे.