शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय-पडीक प्रभागांचे नियोजन कागदावर

By admin | Updated: April 27, 2017 01:18 IST

क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता विभाग, आरोग्य निरीक्षकांचा ताळमेळ जमेना

अकोला : महापालिकेच्या सभागृहात कचऱ्याच्या समस्येवरून घसे कोरडे करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये घाण व कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले आहेत. दैनंदिन साफसफाईसाठी प्रशासनाने पडीक आणि प्रशासकीय प्रभागांचे केलेले नियोजन केवळ कागदावर असल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता विभाग आणि आरोग्य निरीक्षकांचा आपसात कवडीचाही ताळमेळ जमत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. महापालिकेची निवडणूक आटोपल्यानंतर शहरातील साफसफाईच्या कामांना गती येईल, अशी अकोलेकरांना अपेक्षा होती. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचनांचे स्वागत करून प्रशासनाने पडीक प्रभागांची संकल्पना कायम ठेवली. मनपा क्षेत्राची हद्दवाढ होऊन नव्याने प्रभाग पुनर्रचना केली असता २० प्रभागांची निर्मिती करण्यात आली. यापैकी दहा प्रभाग प्रशासकीय तर दहा प्रभागांचा समावेश पडीकमध्ये करण्यात आला. मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत ७४८ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासकीय प्रभागांसाठी करण्यात आली असून, पडीक प्रभागांसाठी ६०० खासगी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. शहर साफसफाईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा लवाजमा असताना ठिकठिकाणी घाणीचे व कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाचे नियोजन केवळ कागदोपत्री दिसत असून, त्याचा नाहक त्रास अकोलेकरांना सहन करावा लागत आहे. आरोग्य निरीक्षकांचे लाड कशासाठी?मनपाच्या आस्थपनेवरील सफाई कर्मचाऱ्यांनी दररोज आठ तास काम करणे गरजेचे आहे. पडीक असो वा प्रशासकीय प्रभागात दैनंदिन साफसफाई होते किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची आहे. शहरातील घाणीचे चित्र पाहता आरोग्य निरीक्षक त्यांचे काम कितपत प्रामाणिकपणे निभावतात, हे दिसून येते. असे असताना प्रशासन आरोग्य निरीक्षकांचे लाड का पुरवते, असा सवाल उपस्थित होतो. पडीक प्रभागात नगरसेवकांचे तोंडावर बोटप्रभागांच्या भौगोलिक क्षेत्रफळात वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेवकांनी पडीक प्रभागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली होती. पडीक प्रभागांसाठी ६०० खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यातील बहुतांश प्रभागांचा कंत्राट नगरसेवकांच्या चेलेचपाट्यांनी घेतला. नगरसेवकांच्या कार्यशैलीचा पूर्वानुभव लक्षात घेता, कागदोपत्री एका प्रभागात ६० कर्मचारी दाखवून प्रत्यक्षात २०-२५ कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतेची कामे करण्याकडे कल आहे. परिणामी, पडीक प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाण व कचरा साचला असताना, नगरसेवकांनी मात्र तोंडावर बोट ठेवल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्षेत्रीय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यातआरोग्य निरीक्षक दैनंदिन साफसफाईचा अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपवितात. मुख्य रस्ते असो वा अंतर्गत रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणांवर साचलेला कचरा पाहता क्षेत्रीय अधिकारी आरोग्य निरीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची एकूणच भूमिका पाहता ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रभागांचे वर्गीकरण केले पण...साफसफाईचे काम चोख व्हावे, यासाठी प्रशासनाने पडीक आणि प्रशासकीय प्रभागांचे वर्गीकरण केले. प्रशासकीय प्रभागांमध्ये आस्थापनेवरील सफाई कर्मचारी अवघ्या तास-दोन तासांत रस्त्यांची थातूर-मातूर झाडपूस करून कामावरून पळ काढतात. काही बहाद्दर हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करून घरी निघून जात असल्याचे प्रकार घडत असताना, संबंधित क्षेत्रीय अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षकांनी डोळ्यांवर पट्टी बांधली की काय, अशी शंका निर्माण होत आहे.