अकोला : जिल्ह्यात निर्माण होणार्या जलसंकटाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. ६४ गावांची खांबोरा पाणीपुरवठा योजना आणि चार गावांची सुकळी नंदापूर पाणीपुरवठा योजना, या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी दिला.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन, तीन महिन्यांचा कालावधी होत आहे; मात्र सार्वत्रिक धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. उलट पावसाळ्याच्या दिवसामध्येच धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या जलसाठय़ात दिवसेंदिवस घट होत आहे. धरणांमध्ये उपलब्ध अत्यल्प जलसाठा बघता, जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. निर्माण होणार्या जलसंकटाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ह्यजिल्ह्यात जलसंकटाची चाहूल; उपाययोजनांसाठी प्रशासनाची लगबगह्ण या शीर्षकाखाली ह्यलोकमतह्णमध्ये बुधवारी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, या धरणातून यापुढे ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा होणार नसून, दगडपारवा धरणातील मृत साठय़ातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी दगडपारवा धरण ते खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंत टाकण्यात आलेल्या जवाहिनीपैकी नादुरुस्त झालेल्या शंभर मीटर जवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी ११ लाख ५0 हजार आणि सुकळी नंदापूर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्तीसाठी २ लाख १५ हजार ४५0 रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश बुधवारी जिल्हाधिकार्यांनी दिला.
दोन पाणीपुरवठा योजना दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
By admin | Updated: August 28, 2014 01:45 IST