पाणीटंचाइ निवारणासाठी २.३४ कोटींच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST2021-04-02T04:18:32+5:302021-04-02T04:18:32+5:30

अकोला: पाणीटंचाइ निवारणासाठी जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व लंघापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसह ४६ गावांत नळ योजनांची विशेष ...

Administrative approval for budget of Rs 2.34 crore for water scarcity relief! | पाणीटंचाइ निवारणासाठी २.३४ कोटींच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता!

पाणीटंचाइ निवारणासाठी २.३४ कोटींच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता!

अकोला: पाणीटंचाइ निवारणासाठी जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व लंघापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसह ४६ गावांत नळ योजनांची विशेष दुरुस्ती व तात्पुरत्या नळ पूरक नळ योजनांच्या कामांकरिता २ कोटी ३४ लाख ७७ हजार ३७४ रुपयांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवार, १ एप्रिल रोजी दिला.

जिल्ह्यातील पाणीटंचाइ निवारणासाठी पाणीटंचाइ निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट ४६ उपाययोजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि लंघापूर ५७ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसह ४६ गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी नळ योजना विशेष दुरुस्ती आणि तात्पूरत्या पूरक नळ योजनांच्या ४६ कामांच्या अंदापत्रकांना प्रशासकीय प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. २ कोटी ३४ लाख ७७ हजार ३७४ रुपयांच्या कामांमध्ये ४१ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि ५ तात्पुरत्या पूरक नळ योजनांचा कामांचा समावेश आहे.

सात नळ योजना विशेष

दुरुस्तीच्या कामांना मान्यता!

जिल्ह्यातील सात नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. ७४ लाख ३६ हजार ५८० रुपयांच्या निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांमध्ये अकोला तालुक्यातील बादलापूर, बार्शिटाकळी तालुक्यातील ढाकली, उजळेश्वर, खांबोरा, खडकी, बाळापूर तालुक्यातील वझेगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना व पारस इत्यादी सात नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती कामाचा समावेश आहे.

Web Title: Administrative approval for budget of Rs 2.34 crore for water scarcity relief!