अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी होणार!
By Admin | Updated: August 30, 2016 02:13 IST2016-08-30T02:13:36+5:302016-08-30T02:13:36+5:30
अकोला जिल्ह्यातील २८ जागांचे होणार समायोजन.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी होणार!
अकोला, दि. २९: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हय़ातील पंचायत समिती स्तरावर झाल्यानंतर, अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा स्तरावरील समायोजन बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामध्ये २८ रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गत २२ ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील सातही पंचायत समितीस्तरावर पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या १७४ प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. उर्वरित १0१ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हास्तरावर जिल्हा परिषदमार्फत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा स्तरावरील समायोजन ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदमार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये १0१ अतिरिक्त शिक्षकांचे प्राधान्यक्रमाने २८ रिक्त जागांवर समायोजन करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.