अकोला : बालकांच्या सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार ३0 विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक या निकषानुसार जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील ३८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे समायोजन समायोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९८ खासगी प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमधील ३0 सप्टेंबर २0१३ अखेरची पटसंख्या बघता एकूण ३८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांवरून सामावून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनीष गावंडे यांनी केली होती.
**अतिरिक्त शिक्षकांचा पेच
जिल्हा परिषद शाळांमध्ये आधीच अतिरिक्त शिक्षक आहेत. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार एकूण १८८ पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. त्यातच आटीईनुसार आणखी अतिरिक्त शिक्षकांची भर पडू शकते. अशावेळी अतिरिक्त शिक्षकांचा पेच शिक्षण विभागाचे अधिकारी कसा सोडवितात,याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.