शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आदित्य म्हणाले मंदी आहेच, रोजगारावर भर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:58 IST

रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

अकोला: देशामध्ये मंदीचे वातावरण आहे. नोकºया गमवाव्या लागत आहेत. जुन्या शिक्षण पद्धतीनुसार कितीही शिकले तरी नोकºया मिळत नाही. त्यामुळे शिक्षण पद्धती बदलून करिअर ओरिएन्टेड शिक्षण पद्धती लागू करण्याची गरज आहे. रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे शिवसेना प्रणित युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आदित्य संवाद कार्यक्रमात युवकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. शिक्षण पद्धती, आरक्षण, महिलांची सुरक्षा, कोचिंग क्लासेसचे वाढलेले शुल्क, महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोटा आदी विषयांवर युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिली. आदित्य ठाकरे यांनी संवाद साधताना, शाळा, महाविद्यालय, कार्यालयांमध्ये महिला, युवतींना सुविधा मिळायला हव्यात, त्याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. यासोबतच शिक्षण हे कोण्याही वर्गाची मक्तेदारी नाही. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यात गरीब, श्रीमंत असा भेद होऊ नये. शिक्षणातून आर्थिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी लाखो रुपये डोनेशन घेतल्या जाते. याला प्रतिबंध घालण्याची विनंती एका विद्यार्थिनी आदित्य ठाकरे यांना केली असता, त्यांनी, मॅनेजमेंट कोटा शासन लवकरच रद्द करणार आहे. डोनेशनचा प्रश्न कधी सुटणार नाही; परंतु ते डोनेशन वैध करण्यासाठी प्रयत्न करू. सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी आपण संघर्ष करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आदित्य ठाकरे म्हणाले, आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावे; परंतु अद्यापही अनेक जातींना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आरक्षण हा विषय सध्या तरी बाजूला सारला जाणार नाही. एका विद्यार्थिनीच्या कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कामुळे गरिबांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी आपण शुल्क नियंत्रणासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी, त्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्याची गरज असून, तो आणण्यासाठी शासनावर दबाव आणणार असल्याचे स्पष्ट केले. रोजगार, करिअरच्या प्रश्नाबाबत बोलताना, त्यांनी शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे. शिक्षणही घेऊनही युवकांना नोकरी मिळत नसल्याची वस्तुस्थिती युवकांसमोर मांडली.

अन् ती विद्यार्थिनी झाली भावुक!एका विद्यार्थिनीने एसटी महामंडळात तिचे वडील कार्यरत असून, त्यांना १७ हजार रुपये पगार आहे. एवढ्या पगार मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे खासगीकरण न करता, शासनात हा विभाग विलीन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना, तिने वडिलांची परिस्थिती कथन केली आणि तिला रडू कोसळले. यासाठी काहीतरी करा, अशी आर्त विनवणी तिने केली. तिच्या विनवणीला प्रतिसाद देत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, यासाठी जरूर प्रयत्न करेल, असे आश्वासन तिला दिले.
शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी हवी!शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अटी लादल्या. या अटी आम्हाला मान्य नाहीत. शेतकºयांना सरसकटच कर्जमाफी हवी. त्यासाठी शासनासोबत आम्ही भांडण मांडले आहे. सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAkolaअकोला