अडगाव खु. येथील जि.प. शाळेच्या खोल्या शिकस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:52+5:302021-07-07T04:23:52+5:30
आता पावसाळा सुरू झाल्यावर पहिल्याच वादळवारा व पावसात शाळेचे छप्पर उडाले आहे. बांधकाम मोडकळीस आले आहे. भिंतींना तडे गेल्याने ...

अडगाव खु. येथील जि.प. शाळेच्या खोल्या शिकस्त
आता पावसाळा सुरू झाल्यावर पहिल्याच वादळवारा व पावसात शाळेचे छप्पर उडाले आहे. बांधकाम मोडकळीस आले आहे. भिंतींना तडे गेल्याने त्या कधीही कोसळतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी व शासन यास जबाबदार राहतील. एकीकडे जिल्हा परिषद शाळांना अच्छे दिन आणण्याची घोषणा पदाधिकारी करतात. परंतु जिल्हा परिषद शाळांना हक्काचे छप्परसुद्धा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो:
निधीची मागणी करूनही दुर्लक्ष
येथील चार वर्गखोल्या शिकस्त श्रेणीत येत आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून निधीची मागणी करूनही निधी मंजूर होत नाही. तरी शाळेचे बांधकाम त्वरित करण्यात यावे. अन्यथा ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अमन गवई व प्रफुल लायडे यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनातून दिला आहे.