Adequate stocks of Remedesivir available in Akola district | अकोला जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध

अकोला जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध

अकोलाकोविड वरील उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर  इंजेक्शन्सचा जिल्ह्यात पुरेसा साथा असून  या औषधाच्या उपलब्धतेसाठी अन्न व औषधे प्रशासन विभाग सज्ज आहे,असे सहायक आयुक्त (औषधे) वि. दा. सुलोचने यांनी कळविले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या रेमडेसिवीर कोविड हॉस्पिटल्सशी संलग्न मेडीकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे.तसेच शासकीय रुग्णालयातही साठा आहे.  ज्यांना रेमडेसिवीर  इंजेक्शन्स हवे असतील त्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी सहि शिक्क्यासह, तसेच आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल, रुग्णाचे आधार कार्ड, खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीचे फोटो ओळखपत्र दुकानदारास दाखवणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यात अकोला शहरातील आयकॉन मेडिकल, व्हीएनआरएन मेडीकल, दत्त मेडीकल, वर्षामेडीकल,  ॲपल मेडिकल,  मैत्री मेडीकल, आरोग्यम स्वस्त औषधी, वननेस फार्मा, जाई मेडीकल, सूर्यचंद्र मेडीकल, केअर मेडीकल, आधार मेडीकल, येथे तर मुर्तिजापूर येथील अवघाटे मेडीकल व सुविधा मेडीकल या ठिकाणी रेमडेसिवीर विक्रीसाठी उपलब्ध आहे

तथापि, कुणालाही यासंदर्भात औषध उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण झाल्यास  अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी औषध निरीक्षक सं. मो. राठोड (मोबाईल क्रमांक-९९२३३०४६५०) संपर्क साधावा. प्रशासनातर्फे याबाबत दररोज आढावा घेतला जात असून  कुठेही तुटवडा निर्माण होणार नाही याचे नियोजन केले जात आहे,असेही सुलोचने यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Adequate stocks of Remedesivir available in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.