अपर आयुक्त, प्रकल्प अधिकार्‍याच्या निवासांची एसीबीकडून झडती

By Admin | Updated: August 13, 2014 00:50 IST2014-08-13T00:50:12+5:302014-08-13T00:50:12+5:30

जनरेटर खरेदीतील गैरव्यवहाराचे प्रकरण

Additional Commissioner, Project Officer's Residences from ACB | अपर आयुक्त, प्रकल्प अधिकार्‍याच्या निवासांची एसीबीकडून झडती

अपर आयुक्त, प्रकल्प अधिकार्‍याच्या निवासांची एसीबीकडून झडती

अकोला: आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी केलेल्या जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये ६७ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर आणि अकोला येथील प्रकल्प अधिकारी महेंद्रसिंग खोजरे यांच्या औरंगाबाद, नांदेड आणि अमरावती येथील निवासस्थानांची मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत झडती घेण्याचे काम सुरू होते. एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर यांचे नांदेड व औरंगाबाद येथे निवासस्थान आहे, तर प्रकल्प अधिकारी खोजरे यांचे अमरावती येथे निवासस्थान आहे. या तिन्ही ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन शिंदे (अमरावती), पोलिस उपअधीक्षक राजपूत (नांदेड) आणि पोलिस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी (औरंगाबाद) यांनी झडती घेतली. या दोन्ही अधिकार्‍यांच्या तिन्ही शहरांमधील निवासस्थानांची रविवारी दुपारी २ वाजतापासून झडती घेण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केले. रात्री ८ वाजेपर्यंत या झडतीमध्ये काहीच सापडलेले नव्हते. निवासस्थानांमधील महत्त्वाची कागदपत्रे, बँक खाती, संपत्तीचे विवरण तपासण्याचे कामही रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती एसीबीचे अकोला पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी दिली.

** धारणी व पांढरकवड्यातही गुन्हा दाखल

अकोला, धारणी व पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये झालेल्या अपहार झाल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी धारणी व पांढरकवडा पोलिस ठाण्यांमध्ये आरोपी विश्‍वंभर वरवंटकर, महेंद्रसिंग खोजरे, जनरेटर्सचा पुरवठा करणार्‍या जेएस एन्टरप्राईजेसचा मालक शब्बीर अली मो. अलिम आणि तत्कालीन एसडीओ महसूल कोकलकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६५, ४६७, ४६९, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

** नांदेड येथील निवासस्थानाहून रिव्हॉल्वर जप्त

अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. झडतीदरम्यान अधिकार्‍यांना वरवंटकर यांच्या निवासस्थानी रिव्हॉल्वर मिळाली. या रिव्हॉल्वरचा परवाना असल्याची माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. ही रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Additional Commissioner, Project Officer's Residences from ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.