विकासकामांसाठी अतिरिक्त १३२ कोटी द्या!

By Admin | Updated: February 5, 2016 02:10 IST2016-02-05T02:10:37+5:302016-02-05T02:10:37+5:30

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांमार्फत मागणी.

An additional 132 crore for development works! | विकासकामांसाठी अतिरिक्त १३२ कोटी द्या!

विकासकामांसाठी अतिरिक्त १३२ कोटी द्या!

अकोला : विविध विभागांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यातील विकासकामांसाठी अतिरिक्त १३२ कोटींचा निधी देण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांमार्फत बुधवारी अमरावती येथील बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) गत १५ जानेवारी रोजी झालेल्या सभेत, शासनामार्फत ठरवून देण्यात आलेल्या र्मयादेनुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील योजना आणि विकासकामांसाठी १00 कोटी २0 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. तथापि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील विकासकामांसाठी अतिरिक्त १३२ कोटींचा निधी शासनामार्फत उपलब्ध करण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी करण्याचा ठराव ह्यडीपीसीह्णच्या सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय बैठकीत जिल्हय़ातील विकासकामांसाठी अतिरिक्त १३२ कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांमार्फत अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, महापालिका आयुक्त अजय लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्‍वर आंबेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विभागनिहाय विकासकामांसाठी मागणी केल्यानुसार अतिरिक्त निधीसंबंधी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी नोंदी घेतल्या.

Web Title: An additional 132 crore for development works!