Adarsh Award for 43 Gram Sevaks in Akola District | अकोला जिल्ह्यात ४३ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार
अकोला जिल्ह्यात ४३ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार

अकोला : ग्रामसेवकांची आदर्श पुरस्कार देण्यासाठीची निवड प्रक्रिया २००७-०८ पासून रखडलेली होती. ग्रामसेवक युनियनने सुरू केलेल्या आंदोलनात ही मागणीही असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गेल्या दहा वर्षात प्राप्त प्रस्तावांतून ४३ ग्रामसेवकांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड समितीने प्रस्तावांची छानणी केली. पंचायत विभागाकडे २००७-०८ ते २०१७-१८ या कालावधीतील प्रत्येक वर्षात प्राप्त प्रस्तावातून निवड करण्यात आली. त्यामध्ये २००७-०८ या वर्षात अकोला तालुक्यातून एस.एस.गावंडे, बाळापूर-डी.एस.अंभोरे, बार्शीटाकळी-एस.जी.खंडारे, मूर्तिजापूर- दीपक मुनेश्वर यांना तर अकोट, तेल्हारा, पातूर तालुक्यातून प्रस्तावच प्राप्त झाले नाहीत.
२००८-०९ : बाळापूर-ए.एस.भुस्कुटे, बार्शीटाकळी-व्ही.जी.सोनवणे, मूर्तिजापूर-पंकज गुजर यांची निवड झाली. तर अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्याचे प्रस्ताव नाहीत.
२००९-१० : बाळापूर-पी.एस.उगले, बार्शीटाकळी-एन.व्ही.दिवनाले, मूर्तिजापूर- सुनील इंगळे. चार तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त नाहीत.
२०१०-११ : तेल्हारा - एम.पी. गीते, बाळापूर-आर.जी.डोंगरे, पातूर-आर.जी. उंदरे, बार्शीटाकळी- पी.डी.क्षीरसागर, मूर्तिजापूर- रवींद्र हिरामण राठोड. तीन तालुक्यातून प्रस्ताव नाहीत.
२०११-१२ : तेल्हारा-जी.बी.खंडेराव, बाळापूर- कु.ए.व्ही.नागरे, पातूर- नंदू निधाना सोळंके, बार्शीटाकळी-एम.एम.नवलकार, मूर्तिजापूर- भारत भोरखडे. दोन तालुक्यातून प्रस्ताव नाहीत.
२०१२-१३ : तेल्हारा- एस.व्ही.कोळसकर, बाळापूर- कु. यू.एम.थिटे, पातूर-जे.एस.मुसळे, बार्शीटाकळी-ज्योती टाले, मूर्तिजापूर-संजय मोटघरे.
२०१३-१४ : तेल्हारा- जी.एस.भुस्कुटे, बाळापूर-टी.एम.माहोरे, पातूर-बी.एस.भोंबळे, मूर्तिजापूर-गोवर्धन जाधव.
२०१४-१५ : तेल्हारा - ममता इंगळे, बाळापूर-एस.एम.काळे, पातूर-वाय.टी.कापकर, बार्शीटाकळी- डी.व्ही.विचारे, मूर्तिजापूर- करुणा वानखडे.
२०१५-१६ : बाळापूर - एस.एस.जाधव, पातूर-ओ.पी.कावलकर, मूर्तिजापूर- देवेंद्र पोधाडे.
२०१६-१७ : बाळापूर- एस.के.चुनडे, बार्शीटाकळी- बबीता सरदार, मूर्तिजापूर- राहुल निखाडे.
२०१७-१८ : बाळापूर-एस.एस.धुळे, बार्शीटाकळी- एस.एस.नांदे, मूर्तिजापूर-विकास गावंडे.

 


Web Title: Adarsh Award for 43 Gram Sevaks in Akola District
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.