कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे भान ठेवावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST2021-06-16T04:26:40+5:302021-06-16T04:26:40+5:30

शिंगणे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देश बंद करावा लागला. भविष्यात नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. ...

Activists should be aware of Corona rules in the program! | कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे भान ठेवावे !

कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे भान ठेवावे !

शिंगणे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देश बंद करावा लागला. भविष्यात नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. कोरोना काळात आशा वर्कर पुढे आल्या. त्यांचे राजेंद्र शिंगणे यांनी आवर्जून कौतुक केले. त्याचबरोबर डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, आशा वर्कर व येथील वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचा कोरोना योद्धा म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सहकार नेते भैयासाहेब तिडके, आतिश महाजन, डॉ. आशा मिरगे, शिवा मोहोड, प्रदेश संघटक सचिव रवी राठी, महिला आघाडीच्या उज्ज्वला राऊत, नगरसेवक प्रशांत डाबेराव, निजाम इंजिनिअर, सदाशिव शेळके, इब्राहिम घाणिवाला, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो:

प्रत्येकी हजार रूपये दंड ठोठावला असता!

राजेंद्र शिंगणे यांनी, कार्यक्रमादरम्यान सभागृहात अनेकांनी तोंडावर मास्क लावलेला नाही. याबाबत नाराजी व्यक्त करीत, माझ्या जिल्ह्यात कार्यक्रम असता तर प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल केला असता. कार्यक्रमात नियम पाळल्या गेले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना लाट ओसरली असली तरी, अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Activists should be aware of Corona rules in the program!