अनधिकृत बांधकामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:35+5:302021-05-30T04:16:35+5:30
शहरात ६८ जण काेराेनाबाधित अकाेला : मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी हाेत चालली आहे. शनिवारी ...

अनधिकृत बांधकामावर कारवाई
शहरात ६८ जण काेराेनाबाधित
अकाेला : मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी हाेत चालली आहे. शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील ६८ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेनमध्ये ३०, पश्चिम झाेन ६, उत्तर झाेन १२ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे २० रुग्ण आढळून आले आहेत़
१५१९ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला : शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे १५१९ जणांनी शनिवारी चाचणी केली. यामध्ये २०० जणांनी आरटीपीसीआर व १३१९ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली़ संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
फेरविचार याचिका दाखल करा !
अकाेला : राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा कोणतीही कारवाई सरकारने केली नाही. या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
रतनलाल प्लाॅट रस्त्यावरील पथदिवे बंद
अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र रतनलाल प्लाॅट चाैक ते दुर्गा चाैकपर्यंतच्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता मनपाने तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
जलवाहिनीचे काम ठप्प
अकाेला : महापालिका प्रशासनाने ‘अमृत’ अभियान अंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे कंत्राट ‘एपी ॲण्ड जीपी’नामक एजन्सीला दिले आहे़ कंत्राटदाराने लक्कडगंज भागातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये जलवाहिनीचे अर्धवट जाळे टाकले असून त्यापुढील काम बंद केले आहे़ यामुळे जलवाहिनी असूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ या प्रकाराकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने कानाडाेळा केल्याचे दिसत आहे़
नाली तुडुंब; नगरसेवकांचे दुर्लक्ष
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या डाबकी राेड येथे डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर मैदानालगत एसबीआय शाखा आहे़ या ठिकाणी प्रमुख चाैकातील मुख्य नाली घाणीने तुडुंब साचली आहे़ साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नालीच्या साफसफाईकडे मनपासह या प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़