सावरगाव येथे वीज चोरी करणाऱ्या दहा जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:09+5:302021-03-27T04:19:09+5:30
सावरगाव येथे थकीत असलेल्या विद्युत बिलाची वसुली करण्यासाठी सस्ती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे व अकोला ...

सावरगाव येथे वीज चोरी करणाऱ्या दहा जणांवर कारवाई
सावरगाव येथे थकीत असलेल्या विद्युत बिलाची वसुली करण्यासाठी सस्ती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे व अकोला महावितरण विभागाचे सहायक अभियंता मोरे, कर्मचारी अरुण गायकवाड, पंकज राठोड, निलेश ढेंगे, मंगेश गवई, हे सावरगाव येथे थकीत असलेल्या विद्युत बिलाची वसुली करीत असताना, अनेक जणांनी विद्युत तारावर अवैध आकोडे टाकून वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वीज चोरी करणाऱ्यावर कारवाई होत असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावात खळबळ उडाली असून, अनेक जणांनी वीज चोरी करण्यासाठी टाकलेले विद्युत तार काढले. त्यामुळे ते कारवाई पासून बचावले. महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा जणांचे नाव महावितरण विभागाने नोंदवून, त्या दहा जणांना दंड भरण्याबाबतची नोटीस बजावण्यात येईल. तसेच वीज चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले विद्युत तार जप्त करण्यात आले आहेत.