मास्क न घालणाऱ्या ४० लोकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST2021-03-23T04:19:55+5:302021-03-23T04:19:55+5:30

सोमवारी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत पोलीस व नगर परिषद प्रशासनाने मूर्तिजापुरात नो मास्क नो ...

Action taken against 40 people who did not wear masks | मास्क न घालणाऱ्या ४० लोकांवर कारवाई

मास्क न घालणाऱ्या ४० लोकांवर कारवाई

सोमवारी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत पोलीस व नगर परिषद प्रशासनाने मूर्तिजापुरात नो मास्क नो एन्ट्री या अभियानांतर्गत मास्क नसलेल्या ४० लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर तिघांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत येथील नागरिक व दुकानदार गंभीर नसल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. सोमवारी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात मास्क न लावता शहरात मुक्त संचार करणाऱ्या ४० लोकांवर कारवाई करीत २०० प्रमाणे दंडात्मक कारवाई करून ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

----------------------------------------

घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणारांवर अशीच कारवाई चालू राहील, नागरिकांनी नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अशा लोकांवर सातत्याने कारवाई करावी लागणार आहे.

- विजय लोहकरे,

मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर

Web Title: Action taken against 40 people who did not wear masks