सिंधी कॅम्पमध्ये हाणामारी
By Admin | Updated: June 29, 2017 00:42 IST2017-06-29T00:42:57+5:302017-06-29T00:42:57+5:30
अकोला : सिंधी कॅम्पमध्ये भाजी बाजारासमोर दोन गटातील युवकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

सिंधी कॅम्पमध्ये हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिंधी कॅम्पमध्ये भाजी बाजारासमोर दोन गटातील युवकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या हाणामारीप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सिंधी कॅम्पमधील अल्पसंख्याक समाजातील दोन लहान मुलांच्या वादातून मोठ्यांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटातील युवक आमने-सामने आल्याने सदर प्रकरण चांगलेच चिघळले; मात्र या हाणामारीची माहिती समाजातील प्रतिष्ठितांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकरण आपसात करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतरही काहींनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या हाणामारीची चौकशी केल्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, दोन्ही गटातील युवकांना समज देण्यात आल्याची माहिती आहे.