कारवाई अंगलट; अकोला मनपाच्या विरोधात पोलिस तक्रार

By Admin | Updated: September 28, 2014 01:46 IST2014-09-28T01:46:01+5:302014-09-28T01:46:01+5:30

जुने बस स्थानक प्रशासनाची धाव

Action; Police complaint against Akola Municipal Corporation | कारवाई अंगलट; अकोला मनपाच्या विरोधात पोलिस तक्रार

कारवाई अंगलट; अकोला मनपाच्या विरोधात पोलिस तक्रार

अकोला : अतिक्रमणाच्या सबबीखाली टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडणे महापालिका प्रशासनाला भोवण्याची चिन्हं आहेत. यासंदर्भात मनपाने कोणतीही लेखी पूर्वसूचना अ थवा नोटीस न देता कारवाई केल्यामुळे एसटी महामंडळाच्यावतीने मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.
टॉवर चौक परिसरात एसटी महामंडळाचे आगार क्र.१ असून बस स्थानकाची आवारभिंत अतिक्रमित असल्याचा दावा करीत मनपाचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. या दरम्यान बस स्थानक परिसरात एसटी महामंडळाकडून अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांची दुकानेसुद्धा पाडण्यात आली; परंतु मनपाने ही कारवाई करण्यापूर्वी कोणतीही लेखी सूचना अथवा नोटीस दिली नसल्याचा आरोप आगार क्र.१ च्या प्रशासनाने केला आहे. जुन्या बस स्थानकाची जागा ही मनपाच्या नव्हे तर महसूल विभागाच्या अख त्यारित असून, जागेचा लिज करार संपल्याचे प्रकरण नागपूर हायकोर्टात प्रलंबित असल्याची माहिती आहे. अशास्थितीत मनपाने केलेली कारवाई आकसपोटी केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. यात भरीस भर आगार क्र.१चे व्यवस्थापक जी.टी.वरोकार यांनी मनपा प्रशासनाने एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसात नोंदवली आहे. या तक्रारीवर पोलिस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.

Web Title: Action; Police complaint against Akola Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.