अवैध नळधारकांवर कारवाई; २ लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: September 29, 2014 02:10 IST2014-09-29T02:10:49+5:302014-09-29T02:10:49+5:30
अकोला महापालिकेची रामा एम्पायरमध्ये कारवाई

अवैध नळधारकांवर कारवाई; २ लाखांचा दंड वसूल
अकोला -महापालिकेच्यावतीने शहरात अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध मोहिम उघडण्यात आली आहे. रविवारी मनपाच्या पथकाने जठारपेठेतील रामा एम्पायरमधील ४0 अवैध नळधारकांवर कारवाई करीत २ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला.
अकोला शहरात दररोज ६ कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी पुरवठा होतो. त्यानंतरही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात मालमत्तेच्या संख्येच्या तुलनेत नळ जोडण्यांची सं ख्या कमी असल्याने मनपाच्यावतीने अवैध नळ जोडणी मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्ग त रविवारी रामा एम्पायरमध्ये कारवाई करण्यात आली. येथील गाळे धारकांची मोठी असतानाही केवळ १0 नळ जोडण्या घेण्यात आल्या असल्याचे मनपाच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे मन पाच्या पथकाने कारवाई करीत रामा एम्पायरमधील ४0 जणांकडून २ लाखं १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.