सिंधी कॅम्पमधील हुक्का पार्लरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:40 IST2021-09-02T04:40:24+5:302021-09-02T04:40:24+5:30
सिंधी कॅम्पमधील एका आतील भागात माेठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती खदानचे ठाणेदार श्रीरंग सनस यांना मिळाली़ या ...

सिंधी कॅम्पमधील हुक्का पार्लरवर कारवाई
सिंधी कॅम्पमधील एका आतील भागात माेठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती खदानचे ठाणेदार श्रीरंग सनस यांना मिळाली़ या माहितीवरून त्यांनी पथकासह रात्री उशिरा छापा टाकला़ या हुक्का पार्लरवरून १२ युवकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़ त्यानंतर या युवकांची जामिनावर सुटका करण्यात आली़ सिंधी कॅम्पमध्ये यापूर्वी सट्टाअड्डा तसेच विविध प्रकारच्या अवैध धंद्यावर छापे टाकण्यात आले असून, हुक्का पार्लरवर पहिल्यांदाच कारवाई झाल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली़
पातूर राेडवरही केली हाेती कारवाई
पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पातूर राेडवर माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करीत शिक्षकांसह सिंधी कॅम्पमधीलच युवकांना ताब्यात घेतले हाेते़ अकाेल्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बाेलले जात हाेते़ त्यानंतर आता सिंधी कॅम्पमधील हुक्का पार्लरवर कारवाई झाल्याने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़