मद्यधुंद वाहनचालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST2020-12-13T04:33:08+5:302020-12-13T04:33:08+5:30

प्राप्त माहितीनुसार, अकोलाहून मूर्तिजापूरकडे महामार्गाने परिवहन अधिकारी निरीक्षक योगीता राणे व चालक मोहम्मद अतहर यांनी ...

Action on drunk driver | मद्यधुंद वाहनचालकावर कारवाई

मद्यधुंद वाहनचालकावर कारवाई

प्राप्त माहितीनुसार, अकोलाहून मूर्तिजापूरकडे महामार्गाने परिवहन अधिकारी निरीक्षक योगीता राणे व चालक मोहम्मद अतहर यांनी पेट्रोलिंग दरम्यान, बोरगावमंजूहून कंटेनरचालक (एन.एल. ०१ एए. ३८८०) भरधाव वेगाने मद्यधुंद अवस्थेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करून इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे वर्तन करीत नागमोडी वळणे घेत वाहन निष्काळजीपणे चालवित असल्याचे दिसले. या प्रकार लक्षात येताच परिवहन महिला अधिकारी राणे यांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहनचालकाने कट मारून पुढे निघून गेला. परिवहन महिला अधिकारी योगीता राणे यांनी कंटेनरचा सिनेस्टाइल पाठलाग करून वाशिंबा बसथांब्यानजीक मद्यधुंद वाहनचालकाच्या मुसक्या आवळल्या. फिर्यादीवरून पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Action on drunk driver