दोषींविरुद्ध होणार कारवाई !

By Admin | Updated: April 18, 2016 02:17 IST2016-04-18T02:17:46+5:302016-04-18T02:17:46+5:30

नवजात बालिका मृत्यू व विटाळी सावरगाव मुदतबाह्य औषध प्रकरण.

Action to be taken against the guilty! | दोषींविरुद्ध होणार कारवाई !

दोषींविरुद्ध होणार कारवाई !

आकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील नवजात बालिका मृत्यू प्रकरण व आकोट तालुक्यातील विटाळी सावरगाव येथे रुग्णांना मुदतबाह्य औषधी दिल्याप्रकरणी दोषींवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत. दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी राजकीय पक्ष व ग्रामस्थांनी केली असून, जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिले. दरम्यान, कुरूम येथील नवजात बालिकेच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य रविवारी एकवटले. रुग्णवाहिकेत इंधन नसल्याने नवजात बालिकेला अमरावत येथे हलविण्यात न आल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कुरूम येथे शुक्रवारी रात्री घडली होती. कुरूम येथील सायना परवीन (३२) यांना १५ एप्रिल रोजी रात्री प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. तिच्या नातेवाइकांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागविली; मात्र त्यात इंधन नसल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे नातेवाइकांनी धावपळ करून ऑटोरिक्षाची व्यवस्था केली; मात्र तोपर्यंत महिला घरीच प्रसूत झाली. नवजात बालिकेला ऑटोरिक्षाने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेवर डॉक्टर हजर नसल्याने परिचारिकेने उपचार केले होते.

Web Title: Action to be taken against the guilty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.