हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST2020-12-16T04:34:38+5:302020-12-16T04:34:38+5:30
पाेलीस अधिकाऱ्यांना नाेटीस अकाेला : शहरासह जिल्ह्यातील ज्या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत माेठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. अशा पाेलीस ...

हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई
पाेलीस अधिकाऱ्यांना नाेटीस
अकाेला : शहरासह जिल्ह्यातील ज्या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत माेठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. अशा पाेलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरून नाेटिसेस बजावण्यात आल्याची माहिती आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी या नाेटीस देण्यात आलेल्या आहेत.
चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे अपघात
अकाेला : गाेरक्षण राेडवरील एका पेट्राेल पंपावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात हाेत असल्याची माहिती आहे. यासाेबतच सर्वाेपचार रुग्णालयासमाेरही अशाच प्रकारची स्थिती असल्याने राेज किरकाेळ अपघात हाेत असल्याचे वास्तव आहे.
साफसफाइकडे कानाडाेळा
अकाेला : शहरातील गाेरक्षण राेड तसेच रिंग राेडवर भाजी विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने माेठ्या प्रमाणात वाढली आहेत; मात्र येथील दुकानामागील साफसफाइकडे सपशेल कानाडाेळा करण्यात येत आहे. प्रशासनाने यावर ताेडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.