युवतींची छेड काढणार्‍या मद्यधुंद  युवकांविरूद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:37 IST2017-10-03T20:36:06+5:302017-10-03T20:37:49+5:30

अकोला: टॉवर चौकातील स्टेट बँकेसमोर मद्यधुंद अवस्थेत  असलेले दोन युवक परिसरातून जाणार्‍या युवतींची छेड काढत  असल्याची माहिती दामिनी पोलीस सेकंड मोबाईल पथकाला  मिळाली. या पथकातील महिला कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर  जात मद्यधुंद दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आणि  त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज दिली. 

Action against drunken youths who have been victimizing the women | युवतींची छेड काढणार्‍या मद्यधुंद  युवकांविरूद्ध कारवाई

युवतींची छेड काढणार्‍या मद्यधुंद  युवकांविरूद्ध कारवाई

ठळक मुद्देटॉवर चौकातील स्टेट बँकेसमोरील घटनादोन मद्यधुंद युवक पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: टॉवर चौकातील स्टेट बँकेसमोर मद्यधुंद अवस्थेत  असलेले दोन युवक परिसरातून जाणार्‍या युवतींची छेड काढत  असल्याची माहिती दामिनी पोलीस सेकंड मोबाईल पथकाला  मिळाली. या पथकातील महिला कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर  जात मद्यधुंद दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आणि  त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज दिली. 
जुने शहरातील भारती प्लॉटमध्ये राहणारा पंकज रमेश फुलकर  आणि शिवसेना वसाहतीत राहणारा कृष्णा हरिभाऊ गावंडे हे  मद्यधुंद अवस्थेत टॉवर चौकातील स्टेट बँकसमोर फिरत होते.  परिसरातून जाणार्‍या युवती, महिलांकडे पाहून अश्लील  हावभाव करीत होते आणि त्यांची छेड काढीत होते. याची माहि ती दामिनी पोलीस पथकाला मिळाल्यावर पथकाला महिला  कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर जावून दोन्ही मद्यधुंद युवकांना  ताब्यात घेतले आणि त्यांना सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात  आणले. याठिकाणी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कलम ११0,  ११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली.  ही कारवाई दामिनी  पोलीस पथकातील रिना बुंदेले, वैशाली रामेकर, शारदा  वाहुरवाघ, रूपाली जवादे यांनी केली. 
-

Web Title: Action against drunken youths who have been victimizing the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.