मूर्तिजापूर येथे मास्क न घालणाऱ्या १३ वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST2021-02-13T04:18:22+5:302021-02-13T04:18:22+5:30
मूर्तिजापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अकोला जिल्ह्यात व मूर्तिजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने ...

मूर्तिजापूर येथे मास्क न घालणाऱ्या १३ वाहनधारकांवर कारवाई
मूर्तिजापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अकोला जिल्ह्यात व मूर्तिजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र असून, प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा मास्क न घालणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. शहरातील तोलाराम चौकात प्रशासनाच्या वतीने १३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून आले. आघवडी बाजार, शासकीय कार्यालय, बसस्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणीही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र होते; मात्र गत तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तरीही नागरिक बिनधास्त असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे ही उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी निवासी नायब तहसीलदार राजू डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, आरोग्य निरीक्षक विजय लकडे, शहाकर, बोयत, जवंजाळ, अब्दुल्ला, पवार, दुबे आदींनी ही कार्यवाही केली. मास्क न घालणाऱ्या १३ लोकांवर मूर्तिजापूर येथील तोलाराम चौक येथे कारवाई करण्यात आली.