शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

फुकट प्रवास करणाऱ्या २६१ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 2:16 PM

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विना तिकीट, अनुचित तिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर धडक मोहीम राबवली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला रेल्वेस्थानकावर भुसावळ विभागातील टिकीट तपासणी पथकाने मंगळवारी आॅन द स्पॉट मोहीम राबवली. या मोहिमेत २८ पथके सहभागी झाले होते. त्यांनी २६१ विना तिकीट प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख २२ हजार २७० रुपये दंड वसूल केला आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विना तिकीट, अनुचित तिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर धडक मोहीम राबवली. ही मोहीम भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा आणि तिकीट तपासणी पथकाचे सहायक वरिष्ठ मंडळ प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.दरम्यान, अकोला रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणी करताना २६१ प्रवासी अनियमित प्रवास करताना पकडल्या गेले.त्यांच्याकडून १ लाख २२ हजार २७० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच विना तिकीट प्रवास करणाºयांविरुद्ध ५७ केसेस दाखल करण्यात आल्या. त्यांच्याकडून २८ हजार ३७० रुपये दंड आकारण्यात आला.तसेच २०३ केसेस अनियमित प्रवास करणाºयांविरुद्ध दाखल करून त्यांच्याकडून ९२ हजार ८६० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच सामानाची बुकिंग न करणाºया एका प्रवासाकडून १ हजार ४० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ज्या दोन प्रवाशांनी दंड भरण्यास असमर्थता दाखवली त्यांच्याविरुद्ध कलम १४४ नुसार खटला चालवण्यात आला आणि आणखी दोन प्रवासांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध १४७ नुसार खटला दाखल करण्यात आला.या मोहिमेत मुख्य टिकीट निरीक्षक तपासणी पथकाचे वाय.डी. पाठक, एटीएस स्कॉड, आयसीपी स्कॉड, सजग स्कॉड, ओडी स्टॉफ आणि इतर अन्य तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन यावेळी रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक