अकोला शहरातील ७० गुन्हेगार तडीपार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:54 IST2018-06-16T15:54:38+5:302018-06-16T15:54:38+5:30
विविध गुन्हे दाखल असलेल्या ७० गुन्हेगारांना दोन दिवसांकरिता अकोला तालुक्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी गुरुवारी दिला.

अकोला शहरातील ७० गुन्हेगार तडीपार !
अकोला : रमजान ईद उत्सवाच्या कालावधीत अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील सहा पोलीस ठाणे अंंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या ७० गुन्हेगारांना दोन दिवसांकरिता अकोला तालुक्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी गुरुवारी दिला.
१६ जून रोजी रमजान ईद उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रमाजान ईद उत्सवाच्या कालावात शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहा पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या ७० गुन्हेगारांना १६ व १७ जून रोजी दोन दिवस अअकोला तालुक्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिला. पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार संबंधित गुन्हेगारांविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आली.