अकोल्यातील हार्ट सर्जरी कॅम्पचे लंडनमध्ये कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:29 IST2017-08-24T01:29:11+5:302017-08-24T01:29:11+5:30

अकोला : गेल्या २२ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या अकोल्यातील हार्ट सर्जरी कॅम्पचे लंडनमध्ये कौतुक करण्यात आले असून, तेथील सदस्यांनी या सेवेसाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती लायन्सच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. डिस्ट्रिक चेअरमन एमजेएफ सुभाष चांडक ४0 सदस्यांसह नुकताच लंडन दौरा करून आलेत. लंडन लायन्स इंटरनॅशनलच्या मीटसंदर्भात त्यांनी माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अँड. पप्पू मोरवाल आणि जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

Acquired Heart Surgery Camp in Akola in London | अकोल्यातील हार्ट सर्जरी कॅम्पचे लंडनमध्ये कौतुक

अकोल्यातील हार्ट सर्जरी कॅम्पचे लंडनमध्ये कौतुक

ठळक मुद्देसुभाष चांडक यांची लंडन लायन्स इंटरनॅशनल मीट

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या २२ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या अकोल्यातील हार्ट सर्जरी कॅम्पचे लंडनमध्ये कौतुक करण्यात आले असून, तेथील सदस्यांनी या सेवेसाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती लायन्सच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. डिस्ट्रिक चेअरमन एमजेएफ सुभाष चांडक ४0 सदस्यांसह नुकताच लंडन दौरा करून आलेत. लंडन लायन्स इंटरनॅशनलच्या मीटसंदर्भात त्यांनी माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अँड. पप्पू मोरवाल आणि जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत डिस्ट्रिक चेअरमन इंटरनॅशनल मीटसाठी  एमजेएफ लॉ. सुभाष चांडक यांची निवड झाली होती. त्याकरिता ९ ऑगस्टपासून ते  ४0 सदस्यांसह लंडन व युरोप दौर्‍यावर होते. माजी प्रांतपाल सरबजित अस्सी व लंडन अँक्टॉन लायन्स क्लबचे अध्यक्ष रवी चोपडा, मंजू मान, ग्यान खुरड, भारतातील लायन्स क्लब अहमदाबादचे माजी अध्यक्ष ललित सराफ, आग्रा मिहानचे सदस्य जगदीश नागवानी, अकोला लायन्सच्या माजी अध्यक्ष अनिता उपाध्याय, प्रकाश आलिमचंदानी, राजेंद्र तापडिया, संतोष वाधवानी, मुरलीधर उपाध्याय यांच्यासोबत लायन्स इंटरनॅशनल मीट झाली. दोघांकडून लायन्स पीन व फ्रेन्डशिप बॅनरचे आदान-प्रदान झाले. यावेळी अकोल्याचे ज्ञानप्रकाश खंडेलवाल, कैलास शर्मा, निरंजन अग्रवाल, अ.भा. अग्रवाल महिला मंडळाच्या उषा अग्रवाल, संतोष खंडेलवाल, मुरलीधर आलिमचंदनी, प्रवीण खंडेलवाल, संध्या खंडेलवाल, सुमन तापडिया, रमेश मालाणी, लीला मालपाणी, दिव्या आलिमचंदानी, मुनमुन आलिमचंदानी, शारदा खंडेलवाल, इनरव्हील क्लबच्याप्रमिला खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होत्या. विश्‍वविख्यात संत मोरारीबापू यांच्या लंडन येथे सुरू असलेल्या रामकथा कार्यक्रमात चांडक यांनी अकोल्याचे आमंत्रण दिले. चांडक यांनी याआधी अमेरिका, लंडन, सिंगापूर, मॉरिशस, कॅनडा, मलेशिया, बँकॉक, इस्रायल, बांगला देश, दुबई, ऑस्ट्रेलिया, र्जमनी, फ्रान्स, न्यूझीलॅड, इटली आदी देशात लायन्स इंटरनॅशनल मीटचे सफल आयोजन केलेले आहे. 

Web Title: Acquired Heart Surgery Camp in Akola in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.