अकोल्याचे तापमान ४४.७
By Admin | Updated: May 9, 2015 01:56 IST2015-05-09T01:56:27+5:302015-05-09T01:56:27+5:30
सकाळपासूनच तापमानवाढीला सुरूवात.

अकोल्याचे तापमान ४४.७
अकोला : मे महिन्याच्या दुसर्या आठवड्याला सुरुवात झाली असून, सूर्य अक्षरश: आग ओकायला लागला आहे. शुक्रवारी याचा प्रत्यय अकोलेकरांना आला. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वांत जास्त ४४.७ डिग्री सेल्सिअस तापमान या दिवशी नोंदवले गेले. अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यात नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला असला तरी मे महिन्यात मात्र कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. मे महिन्याच्या दुसर्या आठवड्याला सुरुवात होताच शुक्रवारी दुपारी तापमानात वाढ झाली. शुक्रवारी कमाल तापमान ४४.७ डिग्री सेल्सिअस होते, तर किमान तापमान २६.१ डिग्री सेल्सिअस होते. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वांत जास्त तापमान आतापर्यंत शुक्रवारी नोंदवले गेले. मे महिन्यात तापमान दररोज ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर राहणार आहे. रात्रीचे तापमानही २१ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्यामुळे नागरिकांना दिवस-रात्र गरमीचा सामना करावा लागत आहे. हवामान खा त्याच्या अंदाजानुसार, तापमानात आणखी वाढ होणार आहे.