शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

श्‍वानदंशाने अकोलेकर त्रस्त

By admin | Updated: April 15, 2015 01:43 IST

अकोला जिल्हय़ात २१४४ तर शहरात १२२६ श्‍वानदंशांच्या घटना.

नितीन गव्हाळे / अकोला: कुत्रा दिसला की अनेकांच्या हृदयाला धडकी भरते. कुत्र्यांच्या दुरूनच जाणे अनेकजण पसंत करतात. सद्यपरिस्थितीत अकोला शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरामध्ये जिल्हय़ात सर्वाधिक श्‍वानदंशाच्या घटना अकोला शहरात घडल्या आहेत. जिल्हय़ात अकोला शहरात १२२६ श्‍वानदंशाच्या घटना, तर त्यापाठोपाठ जिल्हय़ातील आकोट तालुक्यात ५४२ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ३0६ घटना घडल्या आहेत. अकोला शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कुत्र्यांची भरमसाठ संख्या वाढली आहे. गल्लोगल्ली कुत्र्यांचे झुंड फिरताना आढळून येतात. रात्रीच्यावेळी तर नागरिकांना वाहने चालविताना या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते; परंतु महापालिकेचे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुठलेही नियोजन नसल्याने शहरात दररोज श्‍वानदंशाच्या घटना घडत आहेत. महिन्यात अकोला शहरात ३६८ लोकांना श्‍वानदंशाला सामोरे जावे लागते. यामध्ये २७१ पुरुष व ९७ महिलांचा समावेश आहे. यासोबतच २0१४ या वर्षामध्ये अकोला शहरामध्ये १२२६ लोकांना श्‍वानदंश झाला. यामध्ये ८९६ पुरुष तर ३३0 महिलांचा समावेश आहे. यातलहान मुलांचासुद्धा समावेश आहे. शहरासोबतच अकोला जिल्हय़ात कुत्र्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे.