श्‍वानदंशाने अकोलेकर त्रस्त

By Admin | Updated: April 15, 2015 01:43 IST2015-04-15T01:43:25+5:302015-04-15T01:43:25+5:30

अकोला जिल्हय़ात २१४४ तर शहरात १२२६ श्‍वानदंशांच्या घटना.

Acorns stricken by acorns | श्‍वानदंशाने अकोलेकर त्रस्त

श्‍वानदंशाने अकोलेकर त्रस्त

नितीन गव्हाळे / अकोला:
कुत्रा दिसला की अनेकांच्या हृदयाला धडकी भरते. कुत्र्यांच्या दुरूनच जाणे अनेकजण पसंत करतात. सद्यपरिस्थितीत अकोला शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरामध्ये जिल्हय़ात सर्वाधिक श्‍वानदंशाच्या घटना अकोला शहरात घडल्या आहेत. जिल्हय़ात अकोला शहरात १२२६ श्‍वानदंशाच्या घटना, तर त्यापाठोपाठ जिल्हय़ातील आकोट तालुक्यात ५४२ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ३0६ घटना घडल्या आहेत.
अकोला शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कुत्र्यांची भरमसाठ संख्या वाढली आहे. गल्लोगल्ली कुत्र्यांचे झुंड फिरताना आढळून येतात. रात्रीच्यावेळी तर नागरिकांना वाहने चालविताना या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते; परंतु महापालिकेचे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुठलेही नियोजन नसल्याने शहरात दररोज श्‍वानदंशाच्या घटना घडत आहेत. महिन्यात अकोला शहरात ३६८ लोकांना श्‍वानदंशाला सामोरे जावे लागते. यामध्ये २७१ पुरुष व ९७ महिलांचा समावेश आहे. यासोबतच २0१४ या वर्षामध्ये अकोला शहरामध्ये १२२६ लोकांना श्‍वानदंश झाला. यामध्ये ८९६ पुरुष तर ३३0 महिलांचा समावेश आहे. यातलहान मुलांचासुद्धा समावेश आहे. शहरासोबतच अकोला जिल्हय़ात कुत्र्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे.

Web Title: Acorns stricken by acorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.