अकोल्याच्या लेकीचा इंग्लंडच्या संसदेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:51 IST2019-10-02T14:51:14+5:302019-10-02T14:51:59+5:30

अकोला जिल्ह्यातील लेक पद्मश्री कल्पना सरोज यांचा इंग्लंडच्या संसदेने गौरव  केला.

 Acolyte Lecky is proud of the Parliament of England | अकोल्याच्या लेकीचा इंग्लंडच्या संसदेत गौरव

अकोल्याच्या लेकीचा इंग्लंडच्या संसदेत गौरव

अकोला: ग्राम रेपाडखेड या मूर्तिजापूर तालुक्यातील गावात जन्म घेतलेल्या अकोला जिल्ह्यातील लेक पद्मश्री कल्पना सरोज यांचा इंग्लंडच्या संसदेने गौरव  केला.
दोन हजार कोटीच्या स्वामिनी असणाऱ्या व अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या उद्योग सेवेने महिलांसाठी प्रेरणास्थान झालेल्या कल्पना सरोज यांना याआधीही भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन नारी शक्तीचा गौरव केला आहे. कल्पना सरोज या जगभरातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले औद्योगिक विश्व निर्माण केले आहे. आपल्या परिश्रम व मेहनतीने त्या २ हजार कोटींच्या मालकीण बनून महिलांसाठी प्रेरणास्थान झाल्या आहेत. त्यांच्या महिला क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय वूमन इंटर प्रेनर समिट २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले.  महात्मा गांधीजी यांच्या दीडशेव्या जयंतीचा सोहळा सुरू झाला असून, भारतातून या पुरस्काराकरिता योगगुरू रामदेव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही हा पुरस्कार बहाल करण्यात आल्याची माहिती पद्मश्री कल्पना सरोज फाउंडेशनचे सल्लागार छगन खंडारे आॅडिटर यांनी दिली. 

 

Web Title:  Acolyte Lecky is proud of the Parliament of England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.