अल्पवयीन मुलीस फूस लावून नेणारा आरोपी अटकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST2021-09-19T04:20:14+5:302021-09-19T04:20:14+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपूर्णा येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या ...

Accused of seducing minor girl arrested | अल्पवयीन मुलीस फूस लावून नेणारा आरोपी अटकेत!

अल्पवयीन मुलीस फूस लावून नेणारा आरोपी अटकेत!

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपूर्णा येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, ती मुलगी २ दिवसांनी परत घरी आली होती. यावेळी पोलिसांनी तिच्या पालकांचा जबाब नोंदविला होता; मात्र पुन्हा अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची बाब पालकांनी पोलिसांना दिली. यावेळी मुलीने आरोपीच्या भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधत सिलमपूर दिल्ली येथे असल्याची माहिती दिली. यावेळी ठाणेदार सुनील सोळंके, दीपक कानडे, योगेश काटकर, महिला पोलीस कर्मचारी पल्लवी तायडे यांनी तपास पथक तयार केले व दिल्ली येथून अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. या घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार भाऊराव घुगेसह हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे, योगेश काटकर हे करीत आहेत.

Web Title: Accused of seducing minor girl arrested